बेरोजगारीच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा

Foto

औरंगाबाद: बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पदवी प्रमाणपत्राची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात तरुणांची उपस्थिती होती. 

लेबर कॉलनी येथील अण्णाभाऊ साठे चौकातुन मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारीचेसंकट निर्माण झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केला. शासनाची धोरणे व निष्क्रियतेमुळे राज्यातील अनेक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. सरकार मात्र बेरोजगारांकडे दुर्लक्ष करत आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्षे, सूरज चव्हाण, शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष कय्युम शेख यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.